जि.प.केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा,डिघी
पंचायत समिती नांदुरा जि.बुलडाणा
Saturday, 14 April 2018
Monday, 19 February 2018
Monday, 18 September 2017
Tuesday, 23 May 2017
Sunday, 30 April 2017
Saturday, 8 April 2017
आज दि 31/03/2017 रोजी *जि प केंद्रीय म उ प्रा शाळा डिघी पं स नांदुरा जिल्हा परिषद बुलढाणा* येथे *'डिजीटल क्लासरूम उद्घाटन सोहळा*' उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री. संतोषभाऊ लांडे* (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून *श्री. संतोषराव पाटिल* (जि प सदस्य), *सौ. अर्चनाताई शिवाजीराव पाटील* (पं स सभापती) *श्री. संतोषभाऊ डिवरे* (सामाजिक कार्यकर्ते) *सौ. योगिताताई संदिप गावंडे* (पं. स.सदस्य) *श्री. शिवाजीराव पाटील* (जिल्हा अध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ,बुलढाणा) *श्री. संदिपभाऊ गावंडे* (सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार) *श्री. वानखडे साहेब* (ग शि अ.पं.स.नांदुरा)*श्री.डाबेराव साहेब* (शि. वि. अ.) होले सर(के. प्र.) सरपंच, उपसरपंच तथा सर्व ग्रा. पं. स.सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सोबतच पालक व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डिजीटल क्लासरूम चे उद्घाटन करण्यात आले. पं. स.सदस्य *सौ. योगिताताई संदिप गावंडे* यांनी शाळेला प्रिंटर भेट दिले. त्याचे उद्घाटन *सौ.योगिताताई गावंडे व सभापती सौ. अर्चनाताई शिवाजीराव पाटील* यांच्या हस्ते शाळेच्या जाहिरातीच्या प्रिंट काढून करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना *श्री. संतोषराव पाटिल* यांनी डिजीटल शाळेकरिता सर्वांचे अभिनंदन केले तर भविष्यात शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे व *सर्व पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचे आवाहन केले*. *सौ. अर्चनाताई शिवाजीराव पाटील* यांनी शाळा व गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. *श्री. संदिप भाऊ गावंडे* यांनी डिजीटल शाळा काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले व *100 टक्के शाळा डिजीटल करण्यासाठी पालकांना मार्गदर्शन व मदतीचे आवाहन केले.* सेवानिवृत्ती बद्दल *श्री. गाढे सरांचा सत्कार करण्यात आला*. त्याचप्रमाणे बदली झाल्याने *श्री. पारस्कर सर यांचा देखील सत्कार करण्यात आला*. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. चौधरी सर यांनी तर प्रास्ताविक श्री. मैंद सर यांनी केले. *सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवर्ग पालक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले*.
Subscribe to:
Posts (Atom)
जि प केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा डिघी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी लोक प्रतिनिधी म्हणून शा व्य समिती अ...




